पहूर येथे सावित्रीबाई फुले विद्यालयात नेताजी सुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

645

 

पहूर , ता .जामनेर दि . २३ ( प्रतिनिधी ) येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ . प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आज रविवारी आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे या महापुरुषांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला .प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले . प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांनी अध्यक्षस्थान भूषविले .सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले तर इतिहास विभाग प्रमुख हरिभाऊ राऊत यांनी आभार मानले .प्राथमिक विभागाचे पदवीधर शिक्षक युनूस तडवी आणि माध्यमिक विभागाचे लिपीक प्रकाश भाऊ जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.दहावीचे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .