भाजपचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं मान्य

158

राज्यातील राजकीय घडामोडीला सध्या वेग आलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संबोधन करत भावनिक साद घातली. तुम्ही समोर येऊन बोला, मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे, अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान सोडलं.  या राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केली. शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आमदारांसोबतच खासदारही शिंदेच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ठाणे आणि केडीएमसीमधील काही नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवलाय. आता एकनाथ शिंदे यांनी या बंडामागे भाजपचा सपोर्ट असल्याचं मान्य केले आहे.