संजय दत्त फुफ्फुसाच्या कर्करोगानं ग्रस्त, परदेशामध्ये औषधोपचार घेणार ..!

639
मुंबई ,12 /8 /2020 – लिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला फुफ्फुसाचा कर्करोग (lung cancer causes) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने आजाराबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली. संजय दत्त यावर परदेशामध्ये औषधोपचार घेणार असल्याचे म्हटलं जात आहे.
दरम्यान संजय दत्तला कर्करोगाची लागण झाल्याचे समजताच त्याची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करू लागले आहेत. ८ ऑगस्ट रोजी श्वसन प्रक्रियेत त्रास जाणवू लागल्यानंतर संजय दत्तला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर करोना व्हायरस मेडिकल टेस्टही करण्यात आली. त्याची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. औषधोपचारानंतर डॉक्टरांनी त्याला १० ऑगस्टला डिस्चार्जही दिला आणि दुसऱ्या दिवशी त्यानं कर्करोगाबाबतची माहिती दिली.

शस्त्रक्रिया : फुफ्फुसांच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करणे प्रभावी उपचार आहे. पण हा उपाय रुग्णाच्या प्रकृतीवर अवलंबून असतो. याबाबत डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसारच योग्य तो निर्णय घ्यावा. रेडिएशन थेरपी : शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा खात्मा करण्यासाठी रेडिएशन थेरपीची आवश्यकता असते. पण हा उपाय जखम सुकल्यानंतर केला जातो. दरम्यान, ज्या रुग्णांची शस्त्रक्रिया करणं शक्य नसते, त्यांच्यावर रेडिएशन थेरपी आणि कीमोथेरपीद्वारे उपचार केले जातात.