पहूर येथील ‘त्या ‘ कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीचा ओघ सुरुच… !

230

पहूर , ता जामनेर...
जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे लेले नगरातील रहिवासी असणाऱ्या गरीब कुटूंबातील वडिलांनंतर वयोवृद्ध आजींचा जळगाव येथे कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या दुर्देवी घटनेनंतर GM NEWS ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांचे मदतीचे हात पुढे सरसावत आहेत . या मदतीतून सदर कुटूंबाला सावरण्यासाठी नक्कीच बळ मिळत आहे .
आज बुधवारी पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी याकुटुंबीयांचे सात्वन करून ५००० रुपयांची रोख स्वरूपात आर्थिक मदत केली . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री .राजधर पांढरे , माजी पंचायत समीती सभापती श्री.बाबुराव आण्णा घोंगडे , श्री .बालाजी भंडारे , श्री . प्रवीण कुमावत , क्षत्रिय माळी समाज संघटनेचे सचिव श्री . दिपक जाधव यांची उपस्थिती होती .
तसेच वेदांत मेडीकलचे संचालक प्रविण विठ्ठल कुमावत यांनी १००० रुपयांची तर हभप तुकाराम बुवा जाधव यांनी ५०० रुपयांचे सहाय्य केले . एल .आय .सी . चे सल्लागार बालाजी भंडारे यांनी आवश्यक बाजार वस्तू घर पोहोच नेऊन दिल्या . तसेच पाळधी येथील प्रमोद पांडूरंग शिंपी यांनी दोन ड्रेस व २ साड्या तसेच किरण देविदास शिंपी यांनी १ ड्रेस व २ साड्या अशी मदत केली . पाळधी येथील क्षत्रीय शिंपी समाज संघटनेच्या वतीने सांत्वनपर भेट घेत १४०० रुपयांची मदत सुपूर्द केली .
या अगोदर जामनेर येथील सामाजिक कार्यकर्ते पलाश मंडलेचा यांनी पॅसिफिक मॉरलिटी फाऊंडेशनच्या माध्यमातून महीन्याचा किरणा , माजी जिल्हा पंचायत समिती सभापती बाबुराव आण्णा घोंगडे यांनी जिवनावश्यक धान्याचे किट , आर .टी .लेले हायस्कूलचे शिक्षक श्री . विजय विनायक बोरसे सर यांनी ५००० रुपये ,संतोषी माता नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक श्री .पी .टी .पाटील सर यांनी १०००रुपये, पहूर शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा लोकमतचे पत्रकार श्री .मनोज वसंतराव जोशी यांनी १००० , पतंजली केंद्राचे संचालक श्री . जयंत जोशी यांनी १०० रुपयांची मदत केली आहे .मदतीचा ओघ सुरूच असून या कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीचे हात सरसावत आहेत.