अमरावती येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्री. मम्मादेवी तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र शेंदूर्णी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 5 पैकी 2 खेळाडूंना पदक मिळवण्यात यश

164

प्रतिनिधी अमरावती – नुकत्याच दिनांक 29 व 30/06/2022 रोजी अमरावती येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आपल्या श्री मम्मादेवी तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र शेंदूर्णी ता.जामनेर जि.जळगाव येथे प्रशिक्षण घेत असलेल्या 5 पैकी 2 खेळाडूंना पदक मिळवण्यात यश आले आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संघात शेंदूर्णीच्या एकूण 5 खेळाडूंना संधी मिळाली होती. त्यापैकी रेल्वे स्टेशन भागातील चि.दर्शन उमेश बारी याने -45 किलोग्रॅम वजनीगटात रौप्य पदक पटकावले तर चि.साहिल अनवर बेग याने -54 किलोग्रॅम वजनी गटात कांस्य पदक पटकावले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री बाबूलाल रामदास कुमावत व सचिव श्री मनोज तुकाराम कुमावत यांनी अभिनंदन केले. सदर खेळाडूंना जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव श्री अजित घारगे व प्रशिक्षक श्रीकृष्ण विजयकुमार देवतवाल यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे सदर प्रशिक्षण संस्था ही श्री मम्मादेवी क्षत्रिय कुमावत समाज बहुद्देशीय संस्था, शेंदूर्णी यांचे अंतर्गत कार्य करीत असून तायक्वांदो खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांची संलग्नता मिळवून अद्यावयत असे साहित्य खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. सदर खेळाचे प्रशिक्षण हे श्री मम्मादेवी मंदिर परिसरातील अण्णासो भास्करराव गरुड तायक्वांदो सभागृहात नियमित चालू आहे. तरी सदर खेळ हा कराटे खेळासारखा सण 2000 पासून ऑलिम्पिकमध्ये खेळला जाणारा खेळ असून संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त इच्छुक खेळाडूंनी या ऑलिम्पिक पात्र खेळाचे विविध फायदे लक्षात घेता व स्वरक्षणासाठी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.