शेंदुर्णी येथे शांतता कमेटी ची मिटिंग, आषाढी च्या दिवशी बकरी ईद ची कुर्बानी न करण्याचा मुस्लिम बांधवाचा निर्णय

685

शेख हमीद, शेंदुर्णी ता. जामनेर..
प्रतिपढ़रपुर शेंदुर्णी येथे एकच दिवशी आषाडी एकादशी यात्रा व बकरी ईद साजरी होत असल्यामुळे पहुर पोलिस स्टेशन अंतर्गत शेंदुर्णी औट पोस्ट येथे आज मार्केट कमेटी मधे पोलिस निरीक्षक प्रतापराव इगळे साहेब यांच्या अध्यक्षते खाली शांतता मीटिंग पार पडली , यावेळी शहरातील प्रमुख मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ,आषाडी यात्रे मध्ये शांतता व कायदे सुव्येवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहभाग घ्यावा तसेच नगर पंचायत ने व मंदिर संस्थान यांनी काय केले पाहिजे पोलीस यंत्रणेचे  नियोजन कसे पाहिजे यावर चर्चा करण्यात आली, तसेच याच दिवशी मुस्लीम यांची बकरी ईद असल्याने जातीय सलोखा एकता राहावी यासाठी गावातील मुस्लीम बांधवांनी आषाडी एकादशी च्या दिवशी बकरी ईद ची कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचे पोलीस स्टेशन व नगर पंचायत तसेच सर्व हिंदू बांधवांनी स्वागत केले , शेंदुर्णी येथे यावर्षी दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त यांची गर्दी राहणार असल्यामुळे सर्व नियोजन काटेकोर राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रतापराव इगळे साहेब यांनी सागितले आहे , यावेळी पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रतापराव इगळे साहेब , शेंदुर्णी नगर पंचायतचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी , पोलीस उप निरिक्षक दिलीप पाटील , भाजपा चे नेते गोविंद भाई अग्रवाल , राष्ट्रवादी चे नेते सागरमल जैन , शांताराम गुजर , पंडितराव जोहरे , मुस्लीम नेते जावा शेठ ,नबी शाह , मंदिर संस्थान चे पुजारी , शिवसेना शहर अध्यक्ष संजय सूर्यवंशी , पिंटू काझी , शकूर शेख , सुनिल शिनकर , शकील उस्ताद , पो हे कॉ प्रशांत विरणारे , गणी तडवी , गोपाल गायकवाड , शांतता कमेटी चे सर्व सदस्य , हिंदू मुस्लीम तरुण , व पत्रकार उपस्थित होते .