प्रतिपंढरपुर शेंदुर्णी नगरीतील सूर्योदय किड्सचे बाल वारकरी दिंडी

161

शेंदुर्णी ता जामनेर – 

येथिल सूर्योदय किड्स स्कुलच्या बाल वारकऱ्यांच्या पालखी व दिंडी सोहळ्याने प्रतिपंढरपुर नगरीतील आषाढीला सुरुवात झाली. बाल वारकर्यांनी पालखी , झेंडे , डोक्यावर तुळस वारकरी पेहराव करीत पाणी बचाव, वृक्ष लागवडीचा संदेश देत सर्वांचेच लक्ष वेधले .
दिंडी मध्ये पालखी, झेंडे , वृक्ष लागवडीचा संदेश देणारे फलक, होते. त्यासोबत मंदीरा जवळ वारकरी गाण्यावर नृत्य केले. यावेळी विठ्ठल रुख्मीणीची वेशभुषा साकारली यामध्ये विठ्ठल धवल काबरा , प्रज्ञेश कासार , रुख्मीणी रीत्वी जैन हि विद्यार्थीनी होती. स्कूल पासुन कमल किसन नगर ते मुख्य बाजार पेठेतून भगवान श्री त्रिविक्रम मंदीरापर्यंत विठूनामाचा गजर करत आणि झाडे लावाचा संदेश दिला. भगवान श्री त्रिविक्रमाचे दर्शन घेत पालखी सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी सूर्योदय किड्स चे संचालक दिग्विजय सूर्यवंशी, मुख्याध्यापिका सौ पुनम देशमुख , पालक उपस्थीत होते. शिक्षिका सौ मानसी पाटील, डिंकल गरुड, आरती गुजर, सौ माधुरी वारुळे , सिमा पाटील , मदनीस माया पाटील, कल्याणी बारी , यांनी परीश्रम घेतले.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे आषाढी एकादशीला दर्शन ,पालखी व दिंडी सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे अनेक भाविक भक्त आस लावून होते. दोन वर्षांनी होत असलेल्या पालखी व दिंडी सोहळ्याची सुरुवात सूर्योदय किड्सच्या बाल वारकऱ्यांनी केल्याचा आनंद नागरीकांमध्ये आहे.