कासोदा येथे सादिक शाह सरकार यांच्या उर्स निमित्त कव्वाली कार्यक्रम 18 ऑगस्ट रोजी

152

 

जळगाव प्रतिनिधी जावीद शेख) कासोदा ता ,एरंडोल येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सादिक शाह सरकार यांच्या ऊर्स निमित्त कव्वालीच्या कार्यक्रम दिनांक 18 ऑगस्ट रोजी होणार आहे संध्याकाळी 5 ते रात्री 12 वाजे पर्यंत कव्वाली आनंद लुटता येणार आहे या कार्यक्रमांमध्ये टीव्ही सिंगर अजीम नाजा कव्वाल यांची कव्वाली होणार आहेकोरोना काळात दोन वर्षापासून उर्स भरलेला नव्हता आता उर्स भरल्याने हिंदू मुस्लिम भाविकात आनंदाचे वातावरण आहे महिलांची सौंदर्य प्रसाधने ची दुकाने ,मुलांची खेळणी , संसार उपयोगी सामानाची दुकाने, फुलहार, शिरणी (प्रसाद) इस्लामी किताबे (पुस्तक) टोपी रुमाल इतर आदी दुकाने थाटलेली आहेत झुले व मनोरंजन चे विविध खेळांची दुकाने थाटलेली असल्याने तसेच सादिक शाह सरकार ची दर्गावर रोशनाई करण्यात आल्याने उर्सच्या आनंदी वातावरणात व सौंदर्यात भर पडली आहेया कार्यक्रमाला हिंदू मुस्लिम बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन पंच कमिटी अध्यक्ष सैय्यद अफसर अली यांनी केले आहे.