पाचोरा शहरात 100 फुटी उंच राष्ट्रध्वजास नागरिकांनी दिली मानवंदना

178

 पाचोरा प्रतिनिधी जावीद शेख
येथील आज भारत स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्ताने पोलीस कवायत मैदान येथे साजरा करण्यात आला. तसेच राजे संभाजी छत्रपती महाराज चौकात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शंभर फूट तिरंगा ध्वज लावण्यात आला.यावेळी आ. किशोर पाटील, प्रांताधिकारी डॉ विक्रम बादल, तहसीलदार कैलास चावळे, पोलीस उपअधीक्षक भरत काकडे, बीडीओ अतुल पाटील, पोलीस निरीक्षक नजन पाटील, मुख्याध्यापकरी सौ शोभा बाविस्कर, आरोग्य अधिकारी समाधान वाघ, उप पोलीस निरीक्षक योगेश गणगे, जितेंद्र वल्टे, गणेश चौबे, माजी सेनिक संघटनेचे अध्यक्ष बाळू पाटील, प्रदीप संचेती, शाहीर शिवाजी, डॉ. अनिल देशमुख, उपनगराध्यक्ष शरद पाटे, वैशाली सुर्यवंशी सर्व राजकीय पदाधिकारी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.