पिपळगाव हरें.पो. कॉ. राकेश खोंडे आरोपीचा जामीन मंजुर : अॅड. मानसिंग सिंधू

334

 

दिनेश चौधरी, लोहारा ( प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे ) येथील शेतकरी यांनी दि. ०४/१०/२०२२ रोजी याचे दिपक नामदेव बडगुजर याचे तक्रारीवरून स्थानीक गुन्हे शाखा जळगांव यांचेकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनीयमाप्रमाणे कार्यवाही करणेकामी तकार केली की, फिर्यादीने तत्यांच्याच गावातील (पिंपळगाव, हरे ) इसम संतोष चव्हाण यास भाड्याने बैलगाडी व जोडी दिली होती. संतोष चव्हाण हा त्याचे गाडी भाडे व बैलजोडी परत करीत नव्हता .म्हणुन फिर्यादीने त्याचे विरोधात कार्यवाही व्हावी म्हणुन पिंपळगांव हरे. पोलीस ठाण्यात अर्ज केला होता .पिंपळगाव ठाण्याचे आरोपी राकेश दत्तात्रय खोडे पो. काँ याने तुझे काम करून देतो ,असे सांगुन त्याचेकडुन रक्कम रू. ५०००/- लाच मागीतली होती तडजोडी अंती ४०००/- देण्याचे ठरले होते. त्याअनुसार तकारीवरून स्थानीक गुन्हे शाखा जळगांव यांनी आरोपीचे विरोधात कार्यवाही करत ‘सापळा रचला होता, व आरोपी राकेश दत्तात्रय खोंडे व सुकलाल शांताराम पाटील यांना अटक केली होती. त्याकामी पाचोरा पोलीस ठाण्यात आरोपीचे विरोधात गु.र. क. ४५३/२०२२ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७, १२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. दोघे आरोपींना अटक करून लाचलुचपत प्रतिबंधक विशेष न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या वतीने अॅड. मानसिंग प्रतापसिंग सिध्दु यांनी बाजु मांडली कोटाने आरोपींचा जामीन मंजुर केला.