राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, अजित दादा पवारांची फडणवीसांकडे मागणी

219

प्रतिनिधी मुंबई – राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन  शेतकऱ्यांना तात्काळ मदत झाली पाहिजे अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. अजित पवार यांनी काल रात्री (19 ऑक्टोबर) फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ज्या गोष्टी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्या त्या सर्व गोष्टी मी उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे अजित यांनी सागितले आहे .सध्या राज्यात परतीच्या पावसावनं थैमान घातलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात हा परतीचा पाऊस कोसळत आहे. या परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात आहेत. सध्या रब्बी पिकं काढणील आली आहेत.  सोयाबीन, कापूस या पिकांची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी सोयाबीनची काढणी झाली आहे. अशातच गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

अतिवृष्टीतून कशीबशी वाचलेली पिकं परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या परतीच्या पावसानं हिरावून घेतला आहे. त्यामुळ अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र,  उपमुख्यमंत्री फडणवीस हे एमसीए कार्यक्रमात होते. त्यामुळं त्यांची उशीरा भेट झाली. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.