शेंदुर्णीत नववर्षाची सुरुवात साई पालखी मिरवणुकीने. नववर्षाच्या पुर्वसंध्येला तरुणाईंनी घेतला साई सत्संग चा आनंद.

272

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णीत तरुणाईचा आनंद साई पालखी सोबत होता. कोणत्याही पार्ट्या न करता शेंदुर्णीत तरुणांनी साईबाबाची पालखी काढून सत्संग व भजन केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सगळीकडे तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत पार्ट्या करण्याचे नियोजन करीत असली तरी शेंदुर्णीतील तरुण मित्र मंडळीने गावातील मुख्य मार्गावरून साई बाबाची पालखी काढली. साईबाबा ची प्रतिमा असलेल्या पालखीत अनेकांनी त्याचे दर्शन घेतले. त्यापुढे साईबाबा चा सजीव देखावा तयार करण्यात आला .ही पालखी गावातील मुख्य मार्गाने निघत “साईबाबा की जय” “सबका मालिक एक “या घोषणांनी परिसर दणाणून गेला . पालखीची सांगता जंगीपुरा रोडवरील साईबाबा मंदिरात झाली .त्या ठिकाणी साईबाबांची भक्तीमय गाणे वातावरण आनंदमय करीत होते. येथील विठ्ठल गरुड व साई बाबा मित्र मंडळाने घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.नववर्षाच्या सुरुवातीला नागरिकाना,भाविकांना बाबा चा प्रसाद मिळाला.