शेंदुर्णी गरुड विद्यालयात पत्रकार दिन उत्साहात संपन्न.

246

 

शेंदुर्णी:- शेंदुर्णी ता.जामनेर द्वारा संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी.
महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारिता क्षेत्रातील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar) यांचा जन्मदिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ (Darpan) यांची सुरूवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली आहे. 6 जानेवारी 1832 दिवशी हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले आणि 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता. मग राज्य सरकार कडून बाळशास्त्रींच्या जन्मदिनाचं औचित्य साधत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे. मग आज मराठी पत्रकारांना या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास गरुड विद्यालयात आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक पी जी पाटील यांनी केले. यानंतर शेंदुर्णी परिसरातील सर्व पत्रकारांचे यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये पुण्यनगरी चे पत्रकार विलासजी अहिरे, तरुण भारत चे पत्रकार अतुल जहागीरदार,दिव्य मराठीचे डॉ. नीलम कुमार अग्रवाल, स्टार 18 चे शेख हमीद, लोकमतचे वाहीद सईद या सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ पार पाडण्यात आला त्यानंतर मनोगतामध्ये संस्थेची संचालक सागरमलजी जैन यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पत्रकार बंधू मधून तरुण भारत चे पत्रकार अतुलजी जहागीरदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संस्थेचे सचिव सतीशजी काशीद यांनी आपले अध्यक्ष भाषण यावेळी केले.या कार्यक्रमांतर्गत विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थी व त्यांचा पालकांचा देखील गुणगौरव यावेळी करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव सतीश जी काशीद संस्थेचे संचालक सागरमलजी जैन,विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी उदार ,उपमुख्याध्यापक ए.बी ठोके, पर्यवेक्षक जे.एस.जुंबळे,पत्रकार अतुल जहागीरदार, विलास अहिरे, डॉ.नीलमकुमार अग्रवाल, शेख हमीद, वाही सईद, प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, संस्थेचे सहसचिव दीपक गरुड, संस्थेच्या संचालिका उज्वलाताई काशीद, यांनी सर्व पत्रकार बंधूना पत्रकार निमित्त दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीजी पाटील यांनी केले तर आभार डी बी पाटील यांनी मानले.