जि. प.मराठी शाळा मेणगाव शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता परंपरा कायम

285

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला .त्यात जि.प.मराठी शाळा मेणगाव ता.जामनेर जि.जळगाव शाळेचे 2 विद्यार्थी पात्र झाले..दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील मेणगाव शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता परंपरा कायम राखली ….सलग पाच वर्षापासून मेणगाव शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहेत..
ऐश्वर्या कृष्णा कोल्हे(2018)
शुभांगी दिपक कोळी(2019- तालुक्यातून प्रथम)
आदित्य बापू धुमाळ(2020)
नैतिक रामेश्वर कोल्हे(2021)
प्रियंका उमेश जमाले(2022तालुक्यातून प्रथम)

..यावर्षी
वेदांत हरीश महाजन व
सुमित चंद्रशेखर कोळी या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले ….. विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख श्री निवृत्ती पंडितराव जोहरे, श्री.सुनील पांडुरंग पाटील ,श्री.गोपाल नारायण कुमावत,श्री.राजेंद्र देविदास अस्वार,श्री प्रशांत रमेश जोशी (वर्गशिक्षक)व पालक यांचे मार्गदर्शन लाभले…. शाळेने केलेले शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन,सराव,मिशन शिष्यवृत्ती पं.स.जामनेर यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता साधता आली.