डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयास १९९९ च्या बॅच तर्फे स्नेहमेळाव्यात ४०० लिटर क्षमतेचे वॉटर कुलर व फिल्टर भेट

177

“माजी विद्यार्थ्यांची तब्बल २४ वर्षांनी पुन्हा भरली शाळा”

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी )
येथील डॉ.जे.जे.पंडित माध्यमिक विद्यालयातील १९९९ बॅच(इ.10 वी) मधील विद्यार्ध्यांनी एकत्रित येत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ६५ हजार रुपये किंमतीचे ४०० लिटर क्षमतेचे वॉटर कुलर फिल्टर सह भेट म्हणून दिले.
स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २४ वर्षांनी १९९९ चे माजी विद्यार्थी आणि तत्कालीन शिक्षक दि.१४ मे वार रविवार रोजी एकत्रित येत स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
डॉ.पंडित विद्यालयात एका वर्गात बसलेले आणि भविष्याची वाटचाल करताना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले, शालेय जीवनातील सवंगडी स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल दोन तपानंतर म्हणजेच २४ वर्षांनी एकत्रित आले.
शिक्षकांविषयी असलेली आदर युक्त भीती, आजही चेहऱ्यावर कायम ठेवत उत्साह/आनंद व कौतुकाची भावना मनात ठेवत विद्यालयात स्नेह मेळावा पार पडला.
मेळाव्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या निमंत्रणास मान देत तत्कालीन शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापक आर.एस.परदेशी, अ.पटेल, निकम, शिरापुरे, धनगर, चौधरी, जोशी, उदार, लिंगायत ई. सरांनी उपस्थिती लावत आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला व उद्योग व्यवसाय नोकरी करीत असताना आलेला अनुभव व संकटांवर केलेली मात आपल्या भाषणातून सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश भोसांडे, चंद्रकांत पाटील, प्रमोद ठोसर,अमित पाटील, आसिफ पटेल, प्रवीण सुर्वे, गोकुळ सोनवणे, शंकर बावस्कर, सुरेश सूर्यवंशी, योगेश क्षिरसागर, दीपक शेळके, सुनील बच्चेराव, दिपक डोभाळ, विनोद परदेशी, सुरेश सोनवणे, शितल पालीवाल, शरद देशमुख, दिपक कासार, अतुल पाटील, संजय अमोदकर, परशुराम राठोड, विश्वनाथ सरोदे, शांताराम सोनवणे, रमेश चौधरी, रमेश वाघ, भीमराव खरे, सुवर्णा राजपूत, सुरेखा काकडे, मालती लिंगायत, ज्योती पाटील, अर्चना धनगर, ज्योती जाधव आदींनी परिश्रम घेतले.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित तत्कालीन शिक्षक यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. प्रास्ताविक सुवर्णा राजपूत सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर आभार शरद देशमुख यांनी मानले.