शेंदुर्णी येथील ज्येष्ठ शिवसैनिक श्री बारकु जाधव यांची दक्षिण भाग विकास सोसायटी मध्ये तज्ञ संचालक पदी निवड

129

वाघ तो वाघच असतो…
खरतर जंगलात वाघांची संख्या आणि शहरात शिवसैनिकांची संख्या ही कमीच असते पण दोघं ठिकाणी दरारा वाघाचाच असतो आणि वाघाची किंमत फक्त वाघाला समजते..
कुत्र्या मांजरांना नाही असेच शेंदुर्णी शहरात शिवसैनिकांची कथा..

मागील 25 वर्ष झाले शिवसेना भाजप युती होती.पण कधीही भाजप नी शिवसैनिकांना मनाचे स्थान दिले नाही.

मात्र 3 वर्षाच्या महविकास आघाडी सोबत काम करणाऱ्या शेंदुर्णी येथील शिवसैनिक यांना राष्ट्रवादी चे नेते मान.श्री संजय दादा गरुड यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हा प्रमुख मान.श्री दिपक भाऊ राजपूत यांच्या सूचनेनुसार शेंदुर्णी येथील ज्येष्ठ शिवसैनिक श्री बारकु जाधव यांची दक्षिण भाग विकास सोसायटी मध्ये तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली..

या मुळे शेंदुर्णी येथील शिवसैनिक व शिवसेना प्रेमी यांच्यात आनंदाचे उत्साह पाहण्यास मिळाले 35 वर्षापासून पहिल्यांदाच शिवसेनेचा एखादी सर्वसामान्य शिवसैनिकाची अशा सोसायटीमध्ये वर्णी लागली असल्यामुळे एक आनंदाचे वातावरण सर्वच पसरले आहे

जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळेस दक्षिण भाग विकास सोसायटीचे श्री संजय चौधरी चेअरमन श्री प्रवीण गुजर व्हाईस चेअरमन श्री सुरेश बारी विठ्ठल भाऊ गरुड.
सह अन्य संचालक उपस्थित होते तसेच शिवसेनेचे
शिवसेना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी विलास बारी अशोक बारी सुनील अग्रवाल कैलास शेठ काबरा युवराज बारी संदीप बारी तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.