खाकीचा धाक संपला : शेंदुर्णी येथे भर वस्तीत अक्षय गुजर याच्यावर जिवघेणा चाकू हल्ला, 307 प्रमाणे गुन्हा दाखल

1184

प्रतिनिधी शेंदुर्णी  ता जामनेर – येथिल कमल किसन नगरातील भर वस्तीत रात्री ८ वा. जीम वरून येत असतांना अचानक पणे अक्षय वसंत गुजर वय २३ वर्ष याच्यावर पाच ते सहा जणांनी चाकुने वार करून रक्तबंबाळ केला.

अक्षय गुजर हा दत्तनगर येथून जीम आटोपुन घराकडे निघाला असता कमल किसन नगर येथे भर वस्तीत रात्री ८ वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी दर्शन राजु गुजर, लखन विठ्ठल गुजर, रामु विठ्ठल गुजर, सचिन अनिल धनगर आणि इतर तीन ते चार जणांनी जुन्या वादातुन येऊन वाद घालुन अक्षय याच्यावर चाकु व रॉडने पोटावर पायावर हातावर वार करून गंभीर जखमी करून आरोपी यांनी पळ काढला.

रक्तबंबाळ अवस्थेत अक्षय याने एकाच्या मदतीने पोलीस स्टेशन गाठत घटना सांगितली असता त्याला प्राथमिक उपचारासाठी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवले. जखमीची अवस्था बघता अक्षय यास प्राथमिक उपचार करून जळगाव येथिल दवाखाण्यात दाखल केले.

तोपर्यंत पोलीसांनी कार्यवाहीचा बडगा उचलत तात्काळ आरोपींचा शोध सुरु केला असता. दोन संशयित यांना ताब्यात घेतले. इतर आरोपी यांचा शोध सुरु आहे. पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी शेंदुर्णी येथे ठाण मांडून धडक कार्यवाही सुरु केली. पण आता पोलिसांचा धाक संपला असे लोक बोलतं होते कारण दिवसेंदिवस गंभीर गुन्हे घडत आहे, शेंदुर्णी शहराची कायदे सुव्यवस्था शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीसांनी कडक कार्यवाही सुरु केली पाहिजे अशी मागणी होत आहे.

सदर जखमीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दर्शन राजु गुजर, लखन विठ्ठल गुजर, रामु विठ्ठल गुजर, राजु भिला गुजर , सचिन अनिल धनगर आणि इतर जणां विरुध्द भादवि कलम ३०७ व इतर कलमां वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात तणाव पूर्ण शांतता आहे.