शेंदुर्णीत पोलिसांचा धाक संपला. पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावे, जनतेची मागणी

480

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णीत दिवसाढवळ्या तरुणावर चाकू हल्ला झाला. त्याला दोन दिवस उलटत नाही तोच दोन तरुणांनी वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून एक लाख रुपये जबरी हिसकावले. विशेष म्हणजे त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून स्वतःचे पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवले व तपासणीत एक लाख रुपये घेऊन पोबारा केला. अशा प्रकारच्या घटना शेंदुर्णीत वरचे वर सुरूच असल्याचे चित्र दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अपयशी ठरत आहे का? सदर बाबींवर तात्काळ नियंत्रण न मिळवल्यास शेंदुर्णीची कायदा सुव्यवस्था हातून जाण्याचाही धोका निर्माण झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ या प्रकरणी लक्ष घालावे. अन्यथा शेंदुर्णी ची भरभराटीस असलेली विश्वासू बाजारपेठ लयास जाईल . शेंदुर्णीत आश्वासक वातावरण निर्मिती न झाल्यास आजूबाजूच्या गावाहून येणारी बाजार खरेदी करता येणारे ग्राहक दुसरीकडे वळतील. यामुळे ही व्यापाऱ्यांमध्ये चिंतेची सावट पसरले आहे .
शेंदुर्णी गावात सोयगाव, जरडी , निंबायती, जंगला ताडा, लिहा ,मोराड, मालखेडा ,बिलवाडी ,पहुर ,वाकोद, कळमसरा ,लोहारा ,वरखेडी पिंपळगाव ,गोंदेगाव ,गणेश नगर, जंगीपुरा व इतरही अनेक गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. परंतु अशा घटनांचा परिणाम त्यांच्या शिक्षणाच्या कामकाजात होऊन त्यांच्या ऍडमिशन जामनेर पाचोरा सिल्लोड दुसरीकडे वळण्याची भीती व्यक्त केली जात आहे .
शेंदुर्णीत दिवसा व रात्री पोलिसांची गस्त व्हावी, पोलीस वर्दीत पोलिसांनी परिसरात फेरफटका मारावा, वाहतूकदारांना शिस्त लावावी, वाहनांची तपासणी करावी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. संशयास्पंद रीतीत फिरणाऱ्या अनोळखींना पकडावे . शेंदुर्णीतील तरुणांना पोलीस मित्र बनवून त्यांना ओळखपत्र द्याव. शहरात नगरपंचायत, सामाजिक संस्था, बँक यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. शेंदुर्णी आऊट पोस्टला कायमस्वरूपी दूरध्वनी क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक जाहीर करावा. तक्रारींचा निफ्टारा करावा अशी ही मागणी सुज्ञ व संतप्त नागरिकांमधून होत आहे.