वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून एक लाख रुपये हिसकावून तोतया पोलिस पसार

457

शेंदुर्णी ता,जामनेर प्रतिनिधी  – आम्ही पोलीस आहोत तुमची तपासणी घेण्याची आहे असे सांगत मोटर सायकलवरील वयोवृद्ध शेतकऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन दोन तरुणांनी मोटारसायकल वरून पसार झाले आहे ,
याबाबत सविस्तर वृत्त असे की गोंदेगाव येथील वयोवृद्ध शेतकरी कौतिक खाकरे यांनी जिल्हा बँकेतून शेंदुर्णीतून एक लाख नव्वद हजार रुपये काढले व नजीकच्या गोंदेगाव गावी जात असताना पाठीमागून दुचाकी वर येणाऱ्या दोन जणांनी त्यांना अटकले व सांगितले की आम्ही केव्हाचे आवाज देत आहोत तुम्ही थांबत का नाही आम्ही पोलिस आहोत तुमची तपासणी घ्यायची आहे म्हणून त्याला दटावले व दुचाकी च्या हँडलला असलेल्या पिशवीतून एक लाख रुपये काढले व परत शेंदुर्णी कडे पोबारा केला शेतीची मशागत बी बिजवाई खतेसाठी संबंधित शेतकऱ्यांनी पैसे काढलेले होते त्यामुळे पैसे अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे होते म्हणून त्यांनी त्या दुचाकी चा मोटारसायकलीने पाठलाग केला दोन किलो मीटर पाठलाग केल्यानंतर मात्र ते पळण्यात यशस्वी झाले ते पल्सर गाडीवर असल्याने हाती लागू शकले नाही याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे,
शेंदुर्णीत गुंडाराज कायम खाकीचा धाक संपल्याची शेंदुर्णी करांची संतप्त भावना वरिष्ठांचे दुर्लक्ष
शेंदुर्णीत गेल्या कित्येक दिवसापासून छोटे-मोठे गुन्हे हे सतत घडत असून दोन दिवसापूर्वीच एकाने चाकू हल्ला केल्याची घटना ताजी आहे लागलीच काल एक लाख रुपये चोरट्यांनी लांबविले चोरट्यांमध्ये समाजकंटकांमध्ये खाकीचा व कायद्याचा धाक राहिला पाहिजे या करता पोलिसांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे जन माणसात आश्वासक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे अशी ही भावना यावेळी जनतेने व्यक्त केली.