शेंदुर्णीत स्वामी समर्थ केंद्राचा उपक्रम. चांगल्या पावसासाठी ११११ शेतकऱ्यांकडून पर्जन्य या यज्ञ

187

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – येथील स्वामी समर्थ केंद्र, जय हिंद नगर ,शेंदुर्णी यांनी आज आषाढी एकादशी निमित्त त्रिविक्रम मंदिर रोडवर मराठी मुलींच्या शाळेजवळ विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यात ह्या वर्षी चांगला पाऊस व्हावा याकरिता पर्जन्य याग यज्ञ शेतकऱ्यांकडून करून घेण्यात आला .त्यात तब्बल ११११ शेतकरी, शेतमजूर यांनी सहभाग घेतला. याकरता केंद्रप्रमुख संजय कुमावत, गोपाल अग्रवाल, अशोक कासार व इतर सेवेकरींनी सेवा दिली.
त्याच ठिकाणी विविध स्टॉल महिला सेवेकरीच्या वतीने ठेवण्यात आले . वर्षभरात होणारे सण उत्सवाच्या हिंदू संस्कृतीच्या पद्धतीनुसार माहिती व देखावे सादर करण्यात आले. नवीन पिढीला सण उत्सव हिंदू संस्कृतीनुसार कसे साजरे करावे या करता हा उपक्रम स्मिता ताई कुमावत व महिला सेवेकरी यांच्या पुढाकारातून करण्यात आला.