लोहारा येथून जवळच असलेल्या शहापुरा येथे धाडसी चोरी.पोलिसांपुढे आव्हान.

464

 

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहारा येथून जवळच असलेल्या शहापुरा या गावातील सर्वसाधारण शेतकरी व रहिवासी गणेश रुपचंद परदेशी यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने अनाधिकृतपणे प्रवेश करुन ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ८० ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने गेल्याची घटना दि.18 जुलै रोजी घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे ,की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे हद्दीतील शहापुरा गावातील शेतकरी गणेश रुपचंद परदेशी हे दि. 18.7.2023 (मंगळवार) रोजी सकाळी घराला कडी लावून शेतात कामाला निघून गेले होते. याचाच फायदा घेत घरावर पाळत ठेवून अज्ञात व्यक्तीने गणेश रुपचंद परदेशी यांच्या घराची कडी उघडून घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन घरात असलेल्या पत्र्याच्या पेटीचा कडी, कोंडा वाकवून पेटीत असलेले ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ८० भार वजनाचे चांदिचे दागिने चोरुन नेल्याची घटना गणेश परदेशी व त्यांचे कुटुंबीय घरी आल्यावर उघडकीस आली आहे.शहापुरा येथील चोरीची ही बहुतेक पहिलीच घटना आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता या पुढे शेतीचे कामे करावे लागणार असून गावात आणि घरी कोणीच राहणार नाही,त्यामुळे चोरट्यांना संधी मिळूच नये ,म्हणून पोलिसांनी कंबर कसून या भामट्या चोरांचा तपास करावा.अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
या चोरीच्या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर १८०/२०२३ भादवी कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार हे करत असून घटनेची माहिती मिळताच पाचोराचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. धनंजय वेरुळे साहेबांनी घटनास्थळी भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.