शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – जळगाव जिल्हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे डॉक्टर सेलचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सागर गरुड यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश केला.
पक्ष प्रवेश वेळी त्यांचे सोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बावनकुळे प्रदेशाध्यक्ष, संजय गरुड जामनेर तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, अमित देशमुख व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. सागर गरुड यांचे सोबत अडीचशे कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री मा गिरीश महाजन यांनी सांगितले की डॉ . सागर गरुड यांच्या सोबत तरुणांची मोठी फळी आहे. राज्यात विकास कामे सुरु आहे. त्या विकासाच्या मुद्यावर त्यांनी पक्ष प्रवेश केला असून भाजपाला मतदारसंघात आणखी बळकटी मिळणार आहे.
भाजपच्या पक्ष कार्यालय मुंबई येथे पक्ष प्रवेश सोहळ्याला राज्यातील वरिष्ठ नेते व जामनेर पाचोरा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.