ग्रामीण रुग्णालय पहुर येथील सर्व कोरोना रुग्णाना दररोज मिळणार शुद्ध अक़्वा चे बोटल बंद पाणी

195

कमलाकर पाटील व निता पाटील यांचा उपक्रम
प्रतिनिधी पहूर ता. जामनेर –   गेल्या 21 तारखेला कमलाकर पाटिल यांच्या आई सुनंदा पाटिल यांचे दुःखद निधन झाले, त्यांनी समाजसेवेचा जो वारसा पाटिल दांपत्याला घालून दिला त्यातूनच आज आईनच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालय पहुर येथील एडमिट सर्व कोरोना रुगनाना बाटलीबंद अक़्वा चे पाणी आता दररोज मिळणार आहे, सदर रुग्णालयात शेवटचा कोरोना रुग्ण असेपर्यंत ही सेवा असणार आहे,आज 1000 बॉटल्स सुपुर्द करण्यात आल्या,
यावेळी कमलाकर पाटिल, मा सभापति बाबूराव अण्णा घोंगड़े, सरपंच पति पहुर शंकर भाऊ जाधव, उपसरपंच पहुर क. राजू भाऊ जाधव,समाजेवक सुमित भाऊ पंडित, पाळधि मा सरपंच सोपान भाऊ सोनवणे, ग्रा प सदस्य पाळधि ,संदीप सुशिर, देवचंद परदेशी, मनोज नेवे, ईश्वर चोरडिया, विनोद कोळी, चेतन रोकड़े, मनोज जोशी, योगेश पाटिल ,राजू पाटिल खड़के, रामभाऊ कावले, भैया सालुंखे, आदि उपस्थित होते.