प्रति पंढरपूर शेंदुर्णी येथील श्री त्रिविक्रमाचे मंदिर महापूजेनंतर दर्शनासाठी भाविकांना खुले. रात्रीपासूनच मंदिरा बाहेर भाविकांच्या रांगा.

551

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – श्री शेत्र पुण्यनगरी प्रति पंढरपूर शेंदुर्णीत श्री त्रिविक्रमाच्या दर्शनासाठी येण्याची पवनेतिनशे वर्षापूर्वीची परंपरा आजही मोठ्या भक्ती वाता भक्ती बाबांनी उत्साहात सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रात्री बारा वाजता त्रीविक्रमाच्या मूर्तीची पूजा अर्चा आरती श्री शांताराम महाराज भगत ,आठवे गादी वारस, कडोजी महाराज संस्थान. नगराध्यक्ष विजया खलसे, अमृत खलसे , डॉ. राजेंद्र पवार, रेश्मा पवार,पवन अग्रवाल,स्नेहदिप गरुड, व्यंकटेश काबरा. प्रशांत विसपुते, मिलिंद सोनवणे आदींनी केली. पूजा अर्चा शिरीष देवकर ,विजय पाठक, जयवंत पिसे, अरुण जोशी,अड. देवेंद्र पारळकर आदींनी पूजा पठण केले .
विविध सामाजिक संस्था, धार्मिक संस्था यांच्या वतीने प्रत्येक चौकात चौकात रस्त्यावर ठिकठिकाणी मंदिराच्या अवतीभवती फराळाचे, भगरचे स्टॉल, केळी वाटप ,चहावाटप ,शुद्ध पाणी वाटप, चपला बूट स्टॉल, मोठ्या संख्येने होते. त्यामुळे भाविकांनी सदर उपक्रमाचे ही कौतुक केले. प्रार्थमिक आरोग्य केंद्र च्या वतीने मंदिरात प्रथमोपचार कक्ष स्थापन करण्यात आला तसेच पोलीस पथकही जागोजागी तैनात होते. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे, पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोक बंदोबस्त ठेवण्यात आला.