पाचोरा प्रतिनिधी -पाचोरा नगरपरिषद च्या मुख्याधिकारी दालना समोर काँग्रेस ने समस्यांसाठी ढोल बाजओ आंदोलन करताच झोपलेले नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले. तब्बल पाच वर्षांनंतर कामाला सुरुवात…शहरातील नागरिकांच्या वाढत्या समस्या नागरिकांना चालायला रस्ता नाही या विरोधात काँग्रेसने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांच्या दालना बाहेर ढोल बजाव आंदोलन करून जागे केले शहरातील मिल्लत नगर या भागातील नागरिकांना चालायला रस्ता नाही या भागातील रस्त्याचे काम मंजूर होऊन देखील काम सुरू न झाल्यामुळे नागरिक त्रस्त होते. या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन काँग्रेसने मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि समस्यांचा पाढाच वाचून दाखवला यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी तात्काळ शहरातील ज्या ज्या भागातील समस्या दिल्या त्या आम्ही सोडवु हे वचन दिले तेव्हा नागरिकांचा संताप शांत झाला. लागलीच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी मिल्लत नगर भागात भेट दिली आणि संबंधित ठेकेदाराला काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण. माजी सभापती शेख इस्माईल शेख फकीरा,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, इरफान मणियार, महीला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पेश येवले, झानेश्वर पाटील, कुसुमताई पाटील डॉ. मंजूर खाटीक, शरीफ शेख, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश चव्हाण,संदिप पाटील, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अजीम देशमुख, नदीम शेख, आबिद शेख जाबीर बागवान, मुस्तगिर टकारी, नईम मन्यार, रवी पावरा, सै. सय्यद युनुस मणियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते.