सामनेर येथे महात्मा गांधी विद्यालय समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वॉकला जाणार्‍या दोन महिलांचा जागीच मृत्यू

491

लोहारा ( दिनेश चौधरी )
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे महात्मा गांधी विद्यालय समोर आज सकाळी ठीक 5.15 च्या दरम्यान एका अज्ञात वाहनाच्या धडकेने मॉर्निंग वॉकला जाणार्‍या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुःखद घटनेने सामनेर गावावर शोककळा पसरली आहे.साहेबराव बळीराम पाटील यांची पत्नी व शहादु रतन घोसले यांची पत्नि हे सकाळी लवकर फिरायला जात असताना कोणत्या तरी एका वाहनाने त्यांना चिरडले , या अपघातात मनीषा साहेबराव पाटील (48) व अनिता शहादु पाटील (50) यांचा समावेश आहे.त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणलेलं आहे.दोघ मृत महिलांवर संध्याकाळी ठीक 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.