पहूर पोलिसांकडून सलग दुसरा गावठी हातभट्टी विक्रेता स्थानबद्ध

447

प्रतिनिधी पहूर ता. जामनेर– पहुर हद्दीतील चिलगाव येथील इसम नामे- हुसेन सरदार तडवी, वय 43 याचेविरुद्ध पोस्टेला 20 चे वर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अन्वये गुन्हे दाखल आहेत. त्याचे विरुद्ध जळगाव प्रांत कार्यालयाकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. तरीही नमूद इसम कुठल्याही कायद्याची तमा न बाळगता गावठी हातभट्टी निर्मिती व विक्री चालूच ठेवत होता. अखेरीस मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांचेकडून सादर केलेल्या प्रस्तावावर मा. जिल्हाधिकारी महोदय यांचेकडील स्थानबद्धतेचे आदेश क्र.दंडप्र/ कावि/MPDA/05/2024.दि.20/02/24 अन्वये मंजूर झाल्याने त्यास “मध्यवर्ती कारागृह ठाणे” जिल्हा ठाणे येथे पोस्टेचे पोउनि दिलीप पाटील सोबत पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने पुढील “01 वर्षाकरिता स्थानबद्ध” करण्यात आले. सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा.अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा श्री धनंजय येरुळे, मा.वपोनि स्थागुशा श्री किसनराव नजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक दिलीप पाटील, संजय बनसोडे,ASI शशिकांत पाटील,HC वीरनारे,NPC सुभाष पाटील,पोकाॅ/ विजयकुमार पाटील, जिजाबराव कोकणे, ज्ञानेश्वर ढाकरे, गोपाल माळी, संदीप पाटील, प्रशांत बडगुजर आदींनी पार पाडली.